सराफा बाजारात महिलेने लांबविल्या दोन सोन्याच्या बांगड्या

500

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडमधील सराफा बाजारातील आनंद ट्रेडर्स या दुकानात बुरखा परिधान करून आलेल्या एका अज्ञात महिला चोराने त्या दुकानातून तब्बल ९० हजार रुपये किमतीच्या दोन बांगड्या चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी सोनाराने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस त्या अज्ञात चोरटीचा शोध घेत आहेत.

सराफा भागात उत्तम किशनराव गंगमवार यांचे आनंद ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. सराफा भागात अत्यंत गर्दी नेहमीच असते त्या वेळेत काल रात्री त्यांच्या दुकानात एक बुरखाधारी महिला आली आणि मिना काम केलेल्या बांगड्या दाखवा असे तिने दुकानदाराला सांगितला.त्यानंतर दुकानातील सेल्समॅनने मिना काम केलेल्या सोन्याच्या बांगड्यांचा ट्रे काउंटरवर ठेवला त्यात ९ बांगड्याचे सेट होते. या बांगड्या बघता बघता त्या महिलेने ट्रे मधील दोन बांगड्याा स्वत:च्या बॅगेत टाकल्या व तेथून पळ काढला. या बांगड्यांचे वजन ३२ ग्रॅम असून त्याची किंमत जवळपास ९० हजार रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून याचा तपास पोलीस उपनिरिक्षक डी.ए. आडे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या