
सामना प्रतिनिधी । मोखाडा
मोखाड्यात दारूबंदीसाठी स्त्रीशक्ती एकवटली असून त्यांनी बाटली आडवी झालीच पाहिजे, असा नारा देत गुरुवारी पोलीस ठाण्यावर धडक दिली. किनिस्ते, काष्टी-सावर्डे, कारेगाव-कोचाळे, पाचघर-करोळ, सायदे- जोगलकाडी आणि काकडपाडा-उधळे या सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्यांसह सुमारे साडेतीनशे आदिवासी महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत एल्गार केला. खायला अन्न नाही, रोजगार नाही, कुपोषण, दारिद्रय़ाचा फेऱ्यात आदिवासी अडकला असताना दारूची दुकाने मात्र हाऊसफुल्ल होत आहेत. आमचा संसार उद्ध्वस्त होत असून मुलाबाळांवरील अत्याचारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे दारूची दुकाने उद्ध्वस्त करा, आमचा संसार वाचवा, अशी मागणी या आदिवासी महिलांनी यावेळी केली.
मोखाडा तालुक्यात दारूच्या व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गाव-खेड्यापाड्यांमध्ये त्यामुळे अनेकदा कलह निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्रासलेल्या महिलांनी अखेर दारूबंदीचा एल्गार पुकारला असून या सहाही ग्रामपंचायतींमध्ये दारूबंदीचे ठराव घेण्यात आले आहेत. एकढय़ावरच येथील महिला व सरपंच न थांबता त्यांनी सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोखाडा पोलीस ठाण्यावर धडक दिली. आमच्या ग्रामपंचायत हद्दीत कायमस्करूपी दारूबंदी व्हावी असे निवेदन व ग्रामपंचायतीचे ठराव मोखाडा पोलिसांना दिले आहेत. निवेदनात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या दारूभट्टय़ा, तसेच दारू किक्रेत्यांची नाकेही नमूद करण्यात आली आहेत. या धडक मोहिमेत सरपंच भारती शिंदे, कंदना काघमारे, रोहिणी अगिकले, हनुमंत पादीर, दिलीप झुगरे, संजय काघ, मोखाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती एकनाथ झुगरे, कारेगाकचे माजी सरपंच देकराम कडू यांसह बचतगटाच्या शेकडो महिला क ग्रामस्थ सहभागी झाले होते.
शिवसेनेचा पाठिंबा
सहाही ग्रामपंचायती हद्दीतील महिला क पुरुषांनी दारूबंदीसाठी एकजूट केली असून शिवसेनेचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. स्थानिक पोलीस काय कारकाई करतात, याकर सर्कांचे लक्ष आहे. त्यांनी दारूबंदीसाठी सहकार्य न केल्यास करिष्ठांकडे दाद मागणार. – संजय काघ, काकडपाडा सरपंच (शिवसेना)



























































