माजी मंत्री सोळंकेवर बलात्काराचा आरोप, महिलेचे पोलिसांसमोर घुमजाव

सामना प्रतिनिधी । माजलगाव

माजलगाव जिल्ह्यातील माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी घरात काम करणार्‍या महिलेवर मागील अनेक वर्षापासून वारंवार बलात्कार व अत्याचार केला असल्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासमोर लेखी आरोप करणाऱ्या संबंधित महिलेच्या जवाब प्रकरणास कलाटणी मिळाली. बुधवारी संबंधित महिलेने पोलीस आपनावर कारवाई करतील या भीतीने सोळंके यांच्यावर खोटा आरोप केला, असे म्हणून आपली तक्रार मागे घेत असल्याचा जवाब तपासी अधिकारी यांना दिला.

माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या केसापुरी शिवारात असलेल्या बंगल्यातुन 3 लाख रुपये चोरी झाल्याप्रकरणी सोमवारी दोन नोकरांना पोलिसांना ताब्यात घेतले होते. सायंकाळपासून पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर या दोन्ही नोकरांनी चोरीची कबुली दिली नव्हती. मंगळवारी या महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे जाऊन माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी अत्याचार व बलात्कार केला अशी तक्रार केल्याने खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सावंत याची तपासासाठी नियुक्ती केली. बुधवारी या महिलेने पतीसमक्ष सावंत यांना मी चोरी केली नव्हती, पण पोलीस कारवाई होत असल्याने मी भीतीपोटी सोळंके यांचेवर आरोप केले ते खोटे आहेत असा लेखी जवाब नोंदवला. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे.