World cup 2019 : रूट-बटलरचे शतक व्यर्थ, इंग्लंडचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नॉटिंग्हम

आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील सहावा सामना यजमान इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये नॉटिंग्हमच्या ट्रेंटब्रिज मैदानावर झाला. या लढतीत पाकिस्तानने 14 धावांनी विजय मिळवत वर्ल्डकपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. इंग्लंडचे फलंदाज ज्यो रूट आणि ज्योस बटलर यांची शतकी खेळी व्यर्थ गेली.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना बाबर आझम, मोहम्मद हाफिझ आणि कर्णधार सरफराज अहमद यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 8 बाद 348 धावा चोपल्या. वर्ल्डकप इतिहासामध्ये कोणत्याही संघाने इंग्लंडसमोर उभारलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. इंग्लंडकडून वोक्स आणि मोईन अलीने प्रत्येकी 3, तर वूडने 2 बळी घेतले. यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजी समोर टिकाव न लागल्याने इंग्लंडचा संघ 50 षटकात 9 बाद 334 धावा करू शकले. पाकिस्तानने 14 धावांनी विजय मिळवत वर्ल्डकपमधील पहिल्या विजयाची नोंद केली.

पाहा लाईव्ह अपडेट –

  • पाकिस्तानचा 14 धावांनी विजय
  • इंग्लंडचा डाव कोसळला
  • इंग्लंडच्या 300 धावा पूर्ण
  • शतकानंतर बटलर 103 धावांवर बाद
  • जोस बटलरचे शतक
  • अखेरच्या 60 चेंडूत इंग्लंडला 91 धावांची आवश्यकता
  • शतकानंतर रूट 107 धावांवर बाद
  • यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिले शतक
  • ज्यो रूटचे शतक

  • रूट आणि बटलरमध्ये 100 धावांची भागिदारी
  • 90 चेंडूत विजयासाठी 128 धावांची आवश्यकता
  • 35 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 221 धावा

  • इंग्लंडच्या 200 धावा पूर्ण
  • बटलरचे 34 चेंडूत अर्धशतक
  • 120 चेंडूत 162 धावांची आवश्यकता
  • 30 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 187 धावा
  • रूट-बटलरने डाव सावरला
  • इंग्लंडच्या 150 धावा पूर्ण
  • 25 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 148 धावा
  • इंग्लंडला चौथा धक्का, स्टोक्स बाद
  • 30 षटकात विजयासाठी 235 धावांचे आव्हान
  • 20 षटकानंतर इंग्लंडच्या 3 बाद 114 धावा
  • ज्यो रूटचे अर्धशतक

  • इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण
  • 15 षटकानंतर इंग्लंडच्या 3 बाद 86 धावा
  • इंग्लंडला तिसरा धक्का, कर्णधार मॉर्गन बाद
  • दहा षटकानंतर इंग्लंडच्या 2 बाद 62 धावा
  • इंग्लंडला दुसरा धक्का, बेअरस्टो 32 धावांवर बाद

  • इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण
  • पाच षटकानंतर इंग्लंडच्या 1 बाद 28 धावा
  • सलामीवीर जेसन रॉय 8 धावांवर बाद
  • इंग्लंडची खराब सुरुवात

  • दोन षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद 12 धावा
  • इंग्लंडची फलंदाजी सुरू, बेअरस्टो आणि रॉय मैदानात
  • पाकिस्तानचे इंग्लंडसमोर 349 धावांचे आव्हान
  • 50 षटकात पाकिस्तानच्या 8 बाद 348 धावा

  • पाकिस्तानला आठवा धक्का, मलिक बाद
  • जोफ्रा आर्चरची धुलाई, 10 षटकात 79 धावा चोपल्या
  • अर्धशतकानंतर कर्णधार सरफराज बाद
  • पाकिस्तानला सलग दोन धक्के
  • पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी
  • पाकिस्तानच्या 300 धावा पूर्ण
  • हाफिजचे शतक हुकले, वूडच्या गोलंदाजीवर 84 धावांवर बाद
  • पाकिस्तानला चौथा धक्का

  • पाकिस्तानच्या 250 धावा पूर्ण
  • मोहम्मद हाफिजचे अर्धशतक
  • 35 षटकानंतर पाकिस्तानच्या 3 बाद 218 धावा
  • पाकिस्तानच्या 200 धावा पूर्ण
  • पाकिस्तानला तिसरा धक्का, बाबर आझम 63 धावांवर बाद
  • 30 षटकानंतर पाकिस्तानच्या 2 बाद 176 धावा
  • बाबर आझमचे अर्धशतक

  • पाकिस्तानच्या 150 धावा पूर्ण
  • 25 षटकानंतर पाकिस्तानच्या 2 बाद 141 धावा
  • पाकिस्तानला दुसरा धक्का, स्टोक्सचा सुपरडुपर झेल

  • 20 षटकानंतर पाकिस्तानच्या 1 बाद 111 धावा
  • पाकिस्तानच्या 100 धावा पूर्ण
  • 15 षटकानंतर पाकिस्तानच्या 1 बाद 85 धावा
  • पाकिस्तानला पहिला धक्का, फखर जमान बाद
  • दहा षटकानंतर पाकिस्तानच्या बिनबाद 69 धावा
  • पाकिस्तानची दमदार सुरुवात, बिनबाद 50 धावा
  • पाच षटकानंतर बिनबाद 31 धावा
  • पहिल्या षटकानंतर बिनबाद 9 धावा
  • पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुवात
  • इंग्लंडची घरच्या मैदानावर धावांचा पाठलाग करताना 2016 पासूनची कामगिरीएकूण लढती – 20
    विजय – 17
    टाय – 1
    निकाल लागला नाही – 2
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले

  • इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये सामना