#INDvPAK कोल्हापुरात साकारला ‘वर्ल्डकप सेल्फी कॉर्नर’

सामना ऑनलाईन । कोल्हापूर 

हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान मॅनचेस्टरमध्ये विश्वचषक क्रिकेटमधील पहिला हाय व्होल्टेज सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या मुहुर्तावर कोल्हापुर शहरातील लोकप्रिय क्रिकेटवेडे कोल्हापुरी ग्रुपतर्फे ‘वर्ल्ड कप सेल्फी कॉर्नर’चे लोकार्पण केले आहे. या वर्ल्डकप सेल्फी कॉर्नरचे उद्घाटन उद्योजक व्ही.बी. पाटील, स्थायी सभापती सारंगधर देशमुख, माजी रणजीपटू रमेश हजारे, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, संघटक ऋतुराज इगंळे यांच्या उपस्थितीत झाले.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे औचित्य साधून रविवारी या वर्ल्ड कप सेल्फी कॉर्नरचे लोकार्पण करण्यात आले. कोल्हापुर शहरातील एसटी स्टँडच्या पाठीमागे, पारेख पुलाजवळ हा वर्ल्ड कप सेल्फी कॉर्नर तयार केला आहे. क्रिकेटप्रेमी इथे सेल्फी काढू शकतात, वाढदिवस सेलिब्रेट करू शकतात तसेच ज्येष्ठ नागरिक येथे विश्रांती घेऊ शकतात. त्यामुळे या सेल्फी कॉर्नरची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या