चंद्रकांत पालकर । पुणे
तुम्हाला कॅमेरा आणि फोटोग्राफीची आवड आहे. मग तुम्ही पुण्याच्या हाजी फरीद शेख अमीर यांच्या कॅमेरा म्युजियमला नक्कीच भेट दिली पाहिजे. सध्या कोरोनामुळे हे म्युजियम बंद आहे. पण सामनाच्या वाचकांसाठी या म्युजियमची खास सफर.
पुण्यातील हाजी फरीद शेख यांनी जगभरातील अडीच हजारपेक्षा अधिक कॅमेरे जतन करून ठेवले आहेत. त्यात 200 वर्षे जुना नॉवेल्टी कॅमेराही आणि आता नवीने म्हणजेच लेटेस्ट गो प्रो ऍक्शन कॅमेरेही आहेत. 1958 साली हाजी आपल्या वडिलांसोबत ताजमहाल पहायला गेले होते. तेव्हा बाबांनी त्यांन एक कॅमेरा देऊन फोटो काढण्यासाठी दिला. छोट्या शेख यांनी चांगले अँगलने ताजमलहचे फोटो काढले. तेव्हा हाजी यांचे बाबा खूश होऊन हवे ते कॅमेरे विकत घेण्यास राजी झाले. तेव्हापासून हाजी यांनी हे कॅमेरे जतन करण्यास सुरूवात केली आहे. सध्या शेख यांच्याकडे अडीच हजारपेक्षा कॅमेरे आहेत. त्यात 1885 चा मिनिचेर कॅमेरा, 1945चा सेल्फ टायमर कॅमेरा, 1938 चा गुप्तहेर वापरतात तो स्पाय कॅमेरा, 1920 चा बंदुकीचा कॅमेरा, 1914 चा पॉकेट कॅमेरा आणि 1910 सालचा स्टॅम्प कॅमेराही आहे.




























































