
सामना ऑनलाईन । मुंबई
वरळी युनायटेड स्पोर्टस् असोसिएशन आणि शिवसह्याद्री फाऊंडेशन यांच्या संयक्त विद्यमाने यंदा प्रथमच वरळीमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे 26 व 27 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रोख पारितोषिक, ट्रॉफी, पदकांसह विजेत्यांना बक्षीस मिळणार आहेत. विशेष म्हणजे वरळीकरांना वरळीमध्ये पहिल्यांदाच हॉकीचे सामने पाहता येणार आहेत. त्याचसोबत पुरुष व महिलांच्या विविध वयोगटासाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
नऊ वर्षांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व लोक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात. मुले व मुली यांच्यासाठी ट्रक इव्हेंट, फक्त मुलींकरिता टायर इव्हेंट, फुटबॉल, आंतरशालेय हॉकी स्पर्धा हे यंदाच्या खेळीयाडचे आकर्षण आहे. या सर्व स्पर्धा वरळीतल्या जांबोरी मैदान येथे पार पडणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी तत्काळ नावनोंदणी करावी आणि या खेळीयाड चा आनंद लुटावा, असे आवाहन शिवसह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांनी केले आहे. नावनोंदणीसाठी प्रभात मित्र परिवार, जांबोरी मैदान, वरळी इथे सायंकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत संपर्क करायचा आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 9137082909, 9324481448, 9870149116.
























































