राज्य अभ्यासक्रम आराखडय़ावर अभिप्राय, सूचना नोंदवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कचा (शालेय शिक्षण) अभ्यास करून राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क तयार करण्यात येत आहे. राज्याचा अभ्यासक्रम निर्मिती प्रक्रियेचा भाग म्हणून स्थानिक परिस्थिती आणि त्याअनुषंगाने करता येणारे बदल याबाबत अभ्यास करण्यासाठी विविध स्तरातून मते, अभिप्राय, सूचना मागविण्यात आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अभ्यासक्रमाबाबत विषयनिहाय लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. या लिंकवर 29 फेब्रुवारीपर्यंत अभिप्राय नोंदविता येईले. भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, समाजशास्त्र व आंतरविद्याशाखीय शिक्षण त्याचप्रमाणे व्यावसायिक शिक्षण, शालेय संस्कृती व प्रक्रिया सहाय्यभूती प्रणाली तसेच अंतरसमय क्षेत्र याबाबतचे अभिप्राय नोंदवता येणार आहेत.

अभिप्राय नोंदणीसाठी लिंक

आंतरसमवाय क्षेत्र- Cross Cutting Theme – https://forms.gle/caabDKvr1561aRzZ8

भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, सामाजिक शास्त्र व आंतरविद्याशाखीय शिक्षण-  Interdisciplinary Education- https://forms.gle/NMz8v37FEWppCre6A

व्यावसायिक शिक्षण-  Vocational Education – https://forms.gle/97HDFgbsx982CcK7

शालेय संस्कृती व प्रक्रिया, सहाय्यभूत प्रणाली- School Culture and Supportive Ecosystem- https://forms.gle/DasUYLCXfLfFhMTUA