भरधाव कारची डिव्हायडरला धडक, दोन क्रिकेट खेळाडुंचा मृत्यू, तिघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवळमाळ शहरात भरधाव चारचाकी कारने डिव्हायडरला धडक दिली. या भीषण अपघातात क्रिकेट सामने खेळून गावाला परतणाऱ्या दोन खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाली आहे. भोसा मार्गावरील पुलाजवळ शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला.

जयेश प्रविण लोहिया (11) आणि अक्षद अभिषेक बेद (11) अशी मृतांची नावे आहेत. तर दर्श सुमीत ढाबलीया, रुमीत अजय उर्फ गवडू गुळघाणे आणि प्रविण लोहिया अशी अपघात झालेल्यांची नावे आङेत. सर्व जखमी वर्धा येथील रामनगर परिसरातील रविहासी असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा येथील रामनगर स्वावलंबी विद्यालयामधील विद्यार्थी ब्रदर्स हुड नावाच्या क्रिकेट क्लबकडून यवतमाळ शहरातील गोदणी मार्गावर सुरू असलेल्या क्रिकेट सामने खेळायला आले होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास चार विद्यार्थी चारचाकीने (क्रमांक एमएच-32, -एएच 3777) वर्धा येथे आपल्या गावी जात होते. भोसा मार्गावरील पुलाजवळ त्यांची भरधाव कार डिव्हायडरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात जयेश लोहिया आणि अक्षद बेद या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दर्श ढाबलीया, रूमित गुळघाने आणि प्रविण लोहिया हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.