वार्षिक भविष्य – 2020

नीलिमा प्रधान

मेष – यश विलंबाने मिळेल

मेषेच्या अष्टमेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला कामे करण्याचा प्रयत्न करा. सर्व ठिकाणी विलंबाने यश मिळेल. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे निष्फळ ठरवले जातील. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील.
शुभ दिनांक: 22, 23

वृषभ – नोकरीत वर्चस्व वाढेल

वृषभेच्या सप्तमेशात बुध राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या शेवटी कायदा पाळा. पुटुंबात, मैत्रीत गैरसमज होईल. व्यवसायात हिशेब नीट करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. शिक्षणात पुढे जाल. अपरिचित व्यक्तीपासून सावध रहा.
शुभ दिनांक: 23, 24

मिथुन – जवळच्या लोकांची मदत

मिथुनेच्या षष्ठsशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. तुमचा उत्साह टिपून राहिल्याने अनेक समस्यांवर उपाय शोधता येईल. जवळच्या लोकांची मदतच महत्त्वाची ठरेल. वाकडय़ा वाटेने यश मिळवू नका. अडचणी वाढतील. नोकरीत लक्षपूर्वक काम करा.
शुभ दिनांक: 22, 23

कर्क – वेळेला महत्त्व द्या

कर्पेच्या पंचमेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला मानसिक तणाव होईल. क्षुल्लक कारणाने वाद होईल. सहकारी, नेते यांना दुखवू नका. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात प्रेरणा देणारी घटना घडेल. रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. वेळेला महत्त्व द्या.
शुभ दिनांक: 24, 25

सिंह – दौऱ्यात सावध रहा

सिंहेच्या सुखेशात बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. तुमच्याकडील नम्रता, गोड बोलणे यावरच तुम्हाला यश संपादन करावयाचे आहे. दौऱयात सावध रहा. समोरच्या व्यक्तीचे विचार समजून घ्या. पुटुंबात वृद्ध व्यक्तींबरोबर तणाव होऊ शकतो. बोलताना काळजी घ्या.
शुभ दिनांक: 22, 23

कन्या – धावपळ होईल

कन्येच्या पराक्रमात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. या आठवडय़ात कामांची गर्दी होईल. धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांच्या भेटी घ्या. चर्चा करा. पदाधिकार मिळण्याची दाट शक्यता आहे. मेहनत घ्या. राग आवरा.
शुभ दिनांक: 24, 25

तूळ – वसुली करा

तुळेच्या धनेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. यश मिळविण्यासाठी सहनशीलता ठेवा. मेहनत घ्याच. जिद्द ठेवा. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वसुली करा. पुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करता येईल. कोर्टाच्या कामात यश खेचता येईल. शिक्षणात चंचलता ठेवू नका.
शुभ दिनांक: 22, 23

वृश्चिक – मान वाढेल

स्वराशीत बुध राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, जवळच्या व्यक्तीबरोबर मतभेद होतील. संयमी भूमिका घ्या. तुमचा मान वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल अशी घटना घडेल, परंतु सहकारी, नेते यांच्या बोलण्यातून अस्थिरता निर्माण होईल. मनाविरुद्ध घडू शकते.
शुभ दिनांक: 24, 25

धनु – प्रश्न सामोपचाराने सोडवा

धनुच्या व्ययेशात बुध राश्यांतर, चंद्र-गुरु लाभयोग होत आहे. चंद्र-शुक्र प्रतियुती तुम्हाला सहाय्यकारक ठरेल. कोणताही प्रश्न सामोपचाराने सोडवा. टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. रागावर ताबा ठेवा. क्षुल्लक शब्द त्रासदायक ठरतील. कायदा मोडू नका. कला क्षेत्रात परिचय वाढतील.
शुभ दिनांक: 22, 23

मकर – प्रत्येक दिवस प्रगतिकारक

मकरेच्या एकादशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग तुमच्या प्रत्येक कार्याला गतिमान करतील. प्रत्येक दिवस प्रगतिकारक आहे. प्रसंगावधान आणि तत्परता ठेवा. मानप्रतिष्ठा वाढेल. लोकसंग्रह व्यापक करता येईल. धंद्याला परिचयातून नवी दिशा मिळेल. भांडवल आणि पंत्राट मिळेल.
शुभ दिनांक: 23, 24

कुंभ – दिग्गज लोकांचा सहवास

पुंभेच्या दशमेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. प्रत्येक दिवशी महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. दिग्गज लोकांचा सहवास आत्मविश्वास वाढविणारा ठरेल. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येतील. मैत्री वाढेल. पुटुंबात मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल.
शुभ दिनांक: 23, 24

मीन – साहित्याला प्रसिद्धी

मीनेच्या भाग्येशात बुधाचे राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला ताणतणाव होईल. वाद वाढवू नका. जवळच्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवा. त्यांना दुखवू नका. नवे पंत्राट मिळवता येईल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. साहित्याला प्रसिद्धी मिळेल.
शुभ दिनांक: 27, 28

आपली प्रतिक्रिया द्या