येरवड्यात तब्बल 130 किलो गांजा जप्त, तीन जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटारीतून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 24लाख 55 हजार रुपये किंमतीला 130 किलो गांजा जप्त करण्यात आला. येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. अरुण बळीराम जाधव (वय 26, रा. निगडी), प्रशांत हरिभाउ शिंदे (वय 25, रा. काळभोर गोठा, निगडी), आणि शुभम सुनील मोहिते (वय 19, रा. पांगोरी, खेड, पुणे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात गोल्फकडे एका मोटारीतून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती कर्मचारी प्रमोद गाडे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, प्रभारी गुन्हे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीनगर चौकात सापळा रचण्यात आला. त्यावेळी तेथे आलेल्या संशयित मोटारचालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने मोटार न थांबविता जोरात दामटली. त्यामुळे खंडणीव अमली पदार्थ विरोधी पथकाने फिल्मी स्टाईल मोटारीचा पाठलाग करुन अरुण, प्रशांत आणि शुभमला ताब्यात घेतले. त्यांच्या गाडीत पाच गोण्यांमध्ये तब्बल किलो गांजा आढळून आला.

screenshot_2020-09-18-16-58-16-883_com-google-android-gm

ही कामरिगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, दत्ताजी मोहिते, प्रदीप गाडे, रमेश गरुड, मंगेश पवार, सुनील चिखले, विजय गुरव, महेश कदम, साहिल शेख, मनोज शिंदे, फिरोज बागवान, प्रमोद टिळेकर, प्रदीप शितोळे, प्रवीण पडवळ, रुपाली कर्णवर, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.