येरवड्यात टोळक्याचा दोघांवर तलवारीने वार, हातगाडी लावण्यावरून झाला वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

हातगाडी लावण्यावरुन वाद झाल्याने टोळक्याने एकाला मारहाण करून दोघांवर तलवारीने वार केला. ही घटना काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील मच्छिमार्केट परिसरात घडली.

जय सुनिल अ‍ॅन्थोनी असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार अनिकेत जगन्नाथ काकडे, दादया वाघमारे, पिंट्या कुसाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्बर्ट पीटर रेड्डी (वय 29) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्बर्ट आणि जय एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात हातगाडी लावण्यावरुन वाद झाला होता. त्याचा राग आल्यामुळे जयने इतर साथीदारांना बोलावून अल्बर्टच्या हातगाडीवर काम करणाऱ्या तुषार उकिरडेला मारहाण करून तलवारीने वार केला.

त्यामुळे अल्बर्ट घाबरुन पळू लागले असता, टोळक्याने पाठलाग करुन त्यांच्यावर तलवारीने वार करुन गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननावरे तपास करीत आहेत.