
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने ‘ऑक्सिडेंटल डिलीट’ हे फीचर लाँच केले आहे. जे युजर्स ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ पर्यायाऐवजी चुकून ‘डिलीट फॉर मी’ पर्याय निवडतात, त्यांच्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. या फीचरमुळे युजरला व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट केल्यानंतर तो मेसेज पुन्हा रिस्टोअर करण्यासाठी काही सेकंदांचा वेळ मिळेल. युजर्सने ‘डिलीट फॉर मी’ पर्यायावर टॅप केल्यावर त्याला अन डू हा पर्याय उपलब्ध होईल. डिलीट केलेला मेसेज युजर्स अन डू पर्यायावर टॅप करून पुन्हा रिस्टोअर करू शकणार आहे.
याशिवाय व्हॉट्सअॅप लवकरच आणखी एक भन्नाट फीचर आणण्याच्या तयारीत आहे. ‘डिसेबल नोटिफिकेशन्स फॉर कॉल्स’ असे हे फीचर आहे. या फिचरच्या मदतीने यूजर्सना येणाऱया कॉलसाठी नोटिफिकेशन बंद करता येणार आहेत. WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅपने सध्या हे बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे. लवकरच हे फिचर अॅन्ड्रॉईड आणि आयओएस दोन्ही मोबाईल यूजर्सना उपलब्ध होईल. व्हॉट्सअॅपवरील इनकमिंग कॉल्स बंद करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.


























































