चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल

chandrakant-patil

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नियोजन समितीची बैठक संपवून जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर दादासो बबन कळसाईत (36) या तरुणाने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. सदर बझार पोलिसांनी वेळीच धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले.

माढय़ाचे आमदार बबन शिंदे यांच्या आमदार निधीत भ्रष्टाचार करून ठेकेदार, शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांनी पैसे खाल्ल्याचा आरोप दादासो यांनी पोलीस जबाबात केला आहे. व्यायामशाळा न बांधता मंजूर रक्कम ठेकेदार जाधव, शाखा अभियंता निकम, उपअभियंता खरात, कार्यकारी अभियंता माने, सरपंच यांनी परस्पर काढून अपहार केला आहे, अशी तक्रार कळसाईत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिली आहे. कारवाई व्हावी यासाठी त्यांनी तीनवेळा आंदोलन केले तरीही प्रशासनाने दखल घेतली नव्हती. त्यामुळे आज दादासो कळसाईत यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.