पुण्यात पबजी खेळताना 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

548

पुण्यात पबजी हा गेम खेळताना एका 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तो दिवस रात्र मोबाईलमध्ये पबजी खेळत बसायचा अशी माहिती मृत तरुणाच्या कुटुबींयानी दिली. हर्षल मेमाणे असे या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील पिंपरी चिंचवडचा रहिवासी होता.

पबजी खेळण्यास रोखले म्हणून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

हर्षल मेमाणे हा आपले आई वडील दोन भाऊ आणि एका भावासोबत पिंपरी चिंचवडमध्ये राहत होता. त्याचे आई वडील शेतकरी आहेत. तर हर्षल फक्त दहावी शिकला होता. गेली दोन वर्षे तो सातत्याने फक्त पबजी खेळत होता. तो कुठेच नोकरीला नव्हता.

आईने पबजी गेम खेळण्यास नकार दिल्याने मुलाची आत्महत्या

गुरूवारी तो नेहमीप्रमाणे मोबाईलवर पबजी खेळत होता. खेळताना तो खाली कोसळला. हर्षलच्या कुटुंबीयांनी तत्काळ त्याला जवळच्या ओजस इस्पितळात दाखल केले. त्या इस्पितळातून हर्षलला यशवंतराव चव्हाण इस्पितळात हलवण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अतिउत्साहामुळे त्याच्या रक्ताभिसरणावर परिणाम झाला आणि त्यामुळे हर्षलला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी नंमूद केले.

सलग सहा तास पबजी खेळल्यानंतर हार्ट अटॅकने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

आपली प्रतिक्रिया द्या