मरसांगवी येथे वीज पडून युवकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि २१ जून रोजी ४ च्या दरम्यान घडली.

जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील युवक वसिम हसन भांडे (१७) हा शेतात जनावरांसाठी कडबा आणण्यासाठी गेला होता. दुपारी ३ .३० ते ४ दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. याच वेळी वसिमच्या अंगावर वीज पडली. यात तो जागेवर कोसळला. यानंतर त्यास जळकोटच्या ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले मात्र यापूर्वीच वसिमचा मृत्यू झाला होता. जळकोटच्या ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.