
बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने तरुणाचा खून केल्याची घटना सोलापुरातील शांतीनगर परिसरात घडली आहे. नामदेव चौगुले असे मृताचे नाव असून,पोलिसांनी शंकर लिंबोळे याच्यासह त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले आहे.
नामदेव चौगुले याने शंकर लिंबोळे याच्या बहिणीला फूस लावून पळवून नेले होते. याचा लिंबोळे याला राग होता. काल रात्री नामदेव घरी जेवत असताना शंकरने त्याला काम असल्याचे सांगून घराबाहेर नेले. तेथे त्याला शिवीगाळ करीत त्याच्या डोक्यावर कुर्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत नामदेव चौगुले गंभीर जखमी झाला होता.
त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात येत असल्याची माहिती लिंबोळे याने पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी त्याला घटनास्थळापासून काही अंतरावरच ताब्यात घेतले.
मृत चौगुले याची पत्नी आणि मुलगा यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी लिंबोळेच्या साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त कैशाली कडूकर यांनी व इतर करिष्ठ अधिकाऱ्य़ांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम तपास करीत आहेत.


























































