
दुचाकीवर चाललेल्या तरूणाला अडवून टोळक्याने शिवीगाळ करून कोयत्याने वार केल्याची घटना 22 जुलैला पुण्याच्या नवी खडकी परिसरात घडली. या घटनेनंतर टोळक्याने हवेत कोयते फिरवून परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी अंश पुंडे याच्यासह तीन साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वरूप जिरगे (वय 22) याने या घाटाने विरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरूप हे यशवंतनगरमध्ये वास्तव्यास असून 22 जुलैला ते दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी आरोपी अंश पुंडे याच्यासह इतर साथीदारांनी स्वरूपला अडवून शिवीगाळ केली. यावेळी त्याच्या नाकावर आणि कमरेवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याशिवाय दुचाकीसह मोबाइलचे नुकसान देखील केले. या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यामउळे पोलीस उपनिरीक्षक शेलार या घटनेचा तपास करीत आहेत.





























































