
नुकताच ‘झी 5’वर ‘छत्रीवाली’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर याने केले आहे. लैंगिक शिक्षण हे ऑप्शनल नसून ते आवश्यक आहे, हा विचार मांडणारा हा चित्रपट आहे. मुळात आपल्याकडे या विषयावर बोलायला लोक अजूनही संकोच करतात.
लैंगिक शिक्षणाबाबतीत जनजागृती होण्याची खूप गरज आहे, असे तेजस सांगतो. जेव्हा लैंगिक शिक्षणावर आधारित विषय माझ्याकडे आला, तेव्हा आङ्ग-दहा महिने या चित्रपटासाङ्गी संहितेवर काम केले गेले. ‘सेक्स एज्युकेशन’ या विषयावर जे काही रिसर्च पेपर्स सादर झाले आहेत, त्याचा अभ्यास केला गेला. मी याकरिता शाळेतल्या मुलांशी बोललो तर एक गोष्ट लक्षात आली की, या विषयावर घरी बोललं जात नाही, शाळेत बोललं जात नाही. पाङ्गय़पुस्तकात यासंदर्भातील धडे आहेत, पण ते बऱयाच वेळा ऑप्शनला ङ्खेवले जातात. या विषयाच्या संदर्भात मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात, पण त्यांना त्या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळत नाहीत. किंबहुना, ती उत्तरं देणं अनेकदा टाळलं जातं. या सगळय़ातून चित्रपटाची गोष्ट आकाराला आली.
संचित गुप्ता आणि प्रियदर्शी श्रीवास्तव यांनी चित्रपटाचे लेखन केलं आहे. दीडशे वर्षांआधी हजारो वर्षे आपला समाज लैंगिक शिक्षणाविषयी खुल्या मनाने चर्चा करत असे. मात्र गेल्या दीडशे वर्षांत आपल्या समाजाची जडणघडण अशा पद्धतीने झाली आहे की, सेक्सबद्दल बोलताना संकोच केला जातो. या विषयावर योग्य पद्धतीने चर्चा झाली पाहिजे, पण ती होत नाही. या चित्रपटातून लैंगिक शिक्षण हे ऑप्शनल नसून आवश्यक आहे, हा विचार मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तसेच महिलांचे आरोग्य याबाबतीतसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे, हा विचारदेखील मांडला आहे. तेजसशी संवाद साधताना त्याने तो शाळेत असतानाचा एक किस्सा सांगितला. तो शाळेत असताना कोणता तरी एक कार्यक्रम एका संस्थेने आयोजित केला होता, तेव्हा सॅनिटरी नॅपकिनसंदर्भात जागृती करणारी एक पंपनी शाळेत आली होती. तेव्हा त्या कार्यक्रमाच्या वेळी फक्त मुलींना तिथे बसू दिलं गेलं आणि मग मुलांना वर्गात जायला सांगितलं. त्या पंपनीचे लोक नेमके मुलींना काय सांगत आहेत, याचं कुतूहल अर्थातच अनेक मुलांना वाटलं होतं.
तेजस म्हणतो, ‘आजही विज्ञान विषयात ‘सेक्स एज्युकेशन’, ‘री प्रॉडक्शन’ यासंदर्भात काही धडे आहेत, पण ते अनेकदा ऑप्शनला ङ्खेवले जातात. पाङ्गय़पुस्तकातील ते धडे शिकवले तर ते मुलांना वेगळे आणि मुलींना वेगळे शिकवले जातात. म्हणजेच अजूनही जो जीवनातील शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याविषयी बोलताना आपण संकोचतो. हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि तोच विचार मांडण्याचा आम्ही ‘छत्रीवाली’ चित्रपटातून प्रयत्न केला आहे. ‘छत्रीवाली’ या चित्रपटातून पंडोमचा वापर करून सुरक्षित लैंगिक संबंध ङ्खेवता येतात, हा विचार मांडला आहे. एपंदरीत या विषयावर मोकळेपणाने चर्चा होण्याची गरज आहे आणि त्यासंदर्भात काही ङ्गिकाणी भविष्यात परिसंवाददेखील आयोजित केले जाऊ शकतात.
n शब्दांकन ः गणेश आचवल































































