
जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका विद्यार्थिनीने केलेल्या नादखुळा डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणासोबतच इतर गोष्टीही शिकवल्यात जातात. याच पार्श्वभूमीवर या चिमुकलीने वर्गात केलेला डान्स पाहून शिक्षकांनादेखील अचंबित केले. या चिमुकलीने धुरंधर चित्रपटातील शरारत या गाण्यावर असा काही डान्स केला की तिचे हावभाव स्टेप्स पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ @shwetasing_11.11 या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.


























































