पाकड्यांची जिरवली, सरकारी वेबसाईटवर तिरंगा आणि राष्ट्रगीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानच्या सरकारी वेबसाईटवर हिंदुस्थानचं राष्ट्रगीत ऐकू आलं तर? हो हे सत्य आहे. गुरुवारी पाकिस्तानच्या सरकारी वेबसाईटवर हिंदुस्थानचं राष्ट्रगीत ऐकू येत होतं आणि तिरंगाही फडकतांना दिसत होता. एरव्ही हिंदुस्थानला छळणाऱ्या पाकिस्तानी हॅकरच्या नाकावर टिचून काही हॅकर्सनी पाकिस्तानचीच सरकारी वेबसाईट हॅक करून तिरंगा फडकवला होता.
गुरुवारी दुपारी २.४५ ही वेबसाईट हॅक झाली होती. वेबसाईट हॅक झाल्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर हिंदुस्थानचा तिरंगा आणि त्यावर महात्मा गांधी आणि भगत सिंग यांचे फोटो दिसत होते. वेबसाईट ओपन झाल्यावर लगेचच राष्ट्रगीत स्पष्टपणे ऐकू येत होतं तर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा तिथे देण्यात आल्या होत्या. ट्विटरवर एका युझरने ही माहिती शेअर केली आहे. हे लक्षात येताच पाकड्यांची पळापळ सुरू झाली आणि अवघ्या काही वेळातच यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. पाकिस्तान सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, पाकिस्तानची सरकारी वेबसाईट हॅक झाल्याची ही पहिली घटना नाही. दोन महिन्यापूर्वी पाकिस्तान सरकारच्या ३० वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली होती.