ओमान सरकारने पुढील वर्षापासून देशात इन्कम टॅक्स लागू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे खाडी देशात टॅक्स वसूल करणारा ओमान हा पहिला देश ठरला आहे. सध्या खाडी देशात कोणत्याही कामगार आणि तज्ञांकडून इन्कम टॅक्स घेतला जात नाही. परंतु ओमान सरकारने आता नवीन प्रस्ताव आणला आहे. यामुळे ओमानमध्ये राहणाऱया व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 84 लाखांपर्यंत असेल तर त्या व्यक्तीला 5 ते 9 टक्क्यांपर्यंत इन्कम टॅक्स द्यावा लागणार आहे. हा टॅक्स दरवर्षी वाढवला जाणार आहे. ओमानमध्ये राहणाऱया लाखो हिंदुस्थानी नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
कोणत्या देशात किती टॅक्स
ओमान – 5 टक्के वेट, 15 टक्के कॉर्पोरेट टॅक्स, 5 ते 9 टक्के इन्कम टॅक्स (2025पासून लागू होणार)
यूएई – 5 टक्के वेट, 9 टक्के इन्कम टॅक्स
सौदी अरब – 15 टक्के वेट, 15 टक्के कॉर्पोरेट टॅक्स
बहरीन 10 टक्के वेट 10 टक्के कॉर्पोरेट टॅक्स
कतार – 5 टक्के वेट
कुवैत – शून्य टक्के वेट