
>> डॉ. सतीश नाईक (मधुमेहतज्ञ)
चेहऱयावर मास्क, सामाजिक अंतर आणि हात वारंवार धुणे ही कोरोनासोबत जगण्याची त्रिसूत्री आहे. पण यात इतर अननावश्यक वस्तूही आणल्या जातात. हातमोजे अर्थात सर्जिकल हॅण्डग्लोव्हज हे यापैकीच एक. कितपत फायदा होतो या पांढऱया-निळय़ा ग्लोव्हजचा?
अलीकडे बरेच जण हॅण्डग्लोव्हज् वापरताना दिसता, पण सामान्य माणसांनी हॅण्डग्लोव्हज् घालण्याची बिलकूल गरज नाही. कारण डिस्पोजेबल हॅण्डग्लोव्हज् आपण अशासाठी घालतो की, ते जे विषाणू आहेत ते आपल्या हाताला लागू नयेत. आपला हात चुकूनमाकून नाकाला लावला तर तो विषाणू नाकातून शरीरात जाऊ शकतो. त्यासाठी आपण ग्लोव्हज् घालतो, पण ग्लोव्हज् घातलेला हात पुन्हा नाकाला लावला तरी तो प्रश्नच आहे. ग्लोव्हज् एवढंच करतात की, कुठे लागलेला विषाणू आपल्या हाताला थेट लागत नाही, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ते हात कुठे बाहेर कशाला लागले तर तो साबणाने धुतला तर तेच अचिव्ह होतं.
आपल्या येथील उष्ण वातावरणामुळे रबर ग्लोव्हज् वापरल्यावर हाताला घाम येतो. हात ओले राहिल्यामुळे काही संसर्ग होण्याचे, विशेषकरून बुरशीजन्य संसर्ग तिथे होऊ शकतात. आपल्या देशात बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण खूप मोठं आहे. काही ग्लोव्हजच्या मटेरियलची काही लोकांना ऍलर्जी होते. सर्जिकल ग्लोव्हजमध्ये विशिष्ट पावडर घातलेली असते. बऱयाचदा लोक हे ग्लोव्हज् धुऊन पुन्हा वापरतात. विशेषकरून हे ग्लोव्हज् डिस्पोजेबल आहेत. ते डिस्पोज करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून मग ते डिस्पोज व्हायला हवेत. येथे पुन्हा प्लॅस्टिकच्या विघटनाचा प्रश्न आला.
ग्लोव्हज् वापरताना
काही लोक कोणतेही ग्लोव्हज् वापरतात. म्हणजे कॉटनचे, वुलनचे ग्लोव्हज् घालतात. पैकी कॉटनचे ग्लोव्हज् घालायला हरकत नाही, पण ती धुण्याची पद्धत असते. व्यवस्थित धुतले गेले पाहिजेत. तुम्ही त्याला डिप साबणाच्या पाण्यात धुवायला पाहिजे. गरम पाण्यात टाकावेत आणि साबणाच्या पाण्याने धुवावेत. विषाणूच्या वरचे कवच असते ते तेलकट पदार्थांचे बनलेले असते आणि ते जायला फक्त आणि फक्त साबण आणि गरम पाणीच वापरायला हवे.
ग्लोव्हज् हे फक्त बायो हजार्ड वेस्टसाठी घातले जातात अन्यथा अजिबात गरज नाही आहे. डॉक्टरांनी आणि नर्सेसनी घालावेत. त्यांच्यासाठी ते उपयुक्त आहेत, सामान्य माणसांसाठी नाही. त्याची एक मोठी सामाजिक समस्या आहे ती म्हणजे जैविक कचरा. एका अभ्यासात दिसून आले होते की, बऱयाचशा या गोष्टी समुद्रातून पुन्हा किनाऱयावर आल्या. बऱयाचदा कचरा प्रक्रिया न करता समुद्रात सोडण्याची भीती आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन न करता, कचरा प्रक्रिया न करता समुद्रात टाकतात. दुसरी गोष्ट आपल्याकडे रबर, प्लॅस्टिकच्या गोष्टी गोळा करतात, ते कुठे त्यांची काळजी घेतात. त्यामुळे हा एक प्रश्न आहे. त्यात देशाची लोकसंख्या पाहता एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बायोवेस्ट तयार झालं तर मग त्या कचऱयाचे काय करायचे, कुठे तो टाकायचा ही पण एक प्रशासनासमोर असलेली मोठी अडचण आहे. रुग्णालयात काय असतं की, त्यांची बायो वेस्ट डिस्पोजेबलची सिस्टीम बनलेली आहे. त्यामुळे ते तिकडून सहज डिस्पोज करू शकतात, पण सर्वसामान्य माणसं त्या सिस्टीमचा भाग नाहीत ही अडचण आहे. थोडक्यात काय तर हॅण्डग्लोव्हज् घालण्याची गरज नाही. फक्त हात नाकाला स्पर्श करण्यापूर्वी एकतर सॅनिटायझर लावावे नाहीतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

























































