Tips – या 10 गोष्टी आरोग्यासाठी करा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 – उभ्याने पाणी पिणं टाळा
उभ्या उभ्या पाणी पिणाऱ्यांच्या गुडघ्याचं दुखणं जगातील कोणताच डॉक्टर बरं करू शकत नाही. म्हणनूच नेहमी असं सांगितलं जातं की, पाणी नेहमी बसून प्यावं.पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत.

2 – फास्ट फॅन किंवा एसीखाली झोपू नका
फॅन फास्ट करून किंवा एसीजवळ झोपल्याने लवकर वजन जास्त वेगाने वाढतं. त्यामुळे शक्य असेल तितकं प्राकृतिक वातावरण आणि ऋतूमानानुसार तुम्ही स्वत:मध्ये बदल करायचा प्रयत्न केला पाहिजे.

3 – वारंवार पेनकिलर घेणं टाळा
जेव्हा तुमचा एखादा अवयव दुखत असतो तेव्हा 70 टक्के दुखण्यात जर तुम्ही एक ग्लास गरम पाण्यासोबत पेनकिलर घेतली तर ती जास्त वेगाने परिणाम करते. पण प्रत्येक वेळी छोट्या मोठ्या दुखण्यावर पेनकिलर घेणं योग्य नाही. त्यामुळे शक्यतो पेनकिलर टाळा.

4 – नारळाचं पाणी फक्त सकाळीच प्या
सरबत आणि नारळाचं पाणी जर तुम्ही सकाळी 11 वाजण्याआधी प्यायलात तर अमृत आहे पण जर त्यानंतर प्यायलात तर मात्र हानीकारक ठरतं. नारळाचं पाणी हे सकाळीच पिणं शरीरासाठी जास्त चांगलं असतं.

5 – जेवणासाठी अॅल्युमिनिअमच्या भांड्यांचा वापर टाळा
अॅल्युमिनिअमच्या भांड्यांचा वापर कमीत कमी करावा. . जर तुम्ही या भांड्याचं नीट निरीक्षण केलंत तर तुमचं खाणं झाल्यानंतर या भांड्याचा रंग काहीसा बदललेला दिसतो. कारण अॅल्युमिनिअम खाद्यपदार्थांवर रिएक्शन करतं. खासकरून अॅसिडीक पदार्थ उदा टोमॅटो. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

6 – अन्न नेहमी व्यवस्थित चावूनच खा
नेहमी जेवताना प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच. पण ही गोष्ट आपण हसण्यावारी नेतो. खरंतर या गोष्टीचा खरंच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आयुर्वेदानुसार आपल्या तोंडात जेवढे दात आहेत, तेवढ्या वेळा आपण चावून खाल्लंच पाहिजे.

7 – हिंदुस्थानी  शौचालयाचा वापर करा
इंग्लिश स्टाईलच्या टॉयलेट सीटवर बसून शौच केल्यास पोट पूर्णतः साफ होत नाही आणि पोटातली घाण तशीच राहते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेसोबतच मेटाबॉलिजम कमी होणं आणि इतर आजारही होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो हिंदुस्थानी पद्धतीच्या शौचालयाचा वापर तुमच्या आरोग्यासाठी जास्त चांगला आहे.

8 – रात्री वेळेवर झोपा
आपण नेहमीच रात्री उशिरापर्यंत जागतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोप पूर्ण झाली नाही असं म्हणतो. तुमचं काही महत्त्वाचं काम नसल्यास उगाच उशिरापर्यंत जागणं टाळा. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणं म्हणजे रात्री झोप न येणं. झोपेची ही कमतरता धूम्रपानाइतकीच धोकादायक आहे.

9 – नाश्ता करणं आवश्यक
धावपळीच्या आयुष्यात लोक नेहमीच नाश्ता करणं टाळतात. पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता टाळता तेव्हा तुम्हाला दिवसभर सुस्ती जाणवते. सोबतच तुमचं वजनही वाढतं.

10 – शिंक थांबवू नका
शिंक आली की, अनेकदा आपण ती थांबवायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. शिंक थांबवल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाहीतर तुमच्या शरीराची रक्त धमनीही फुटू शकते. त्यामुळे कधीही शिंक आल्यास ती थांबवायचा प्रयत्न करू नका.