जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर 103 दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्याने ऑपरेशन ऑलआऊट यशस्वी झाले होते. ते चांगलेच यशस्वी झाले असून पुलवामा हल्ल्यानंतर ते आतापर्यंत सैन्याने 103 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. एएनआयने या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

2018 साली सुरक्षा दलाने 254 दहशतवाद्यांना कंठस्नाम घातले. तर पाकिस्तानने यंदा गेल्या पाच महिन्यात 1हजार 170 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर 2018 साली पाकड्यांनी 1629 वेळा शस्रसंधींचे उल्लंघन केले आहे. सुरक्षा दलाने एक जानेवारी ते सहा जून या कालावधीत सुरक्षा दलाने 103 दहशतवाद्यांनी मारले.

शुक्रवारीच पुलवामात एका चकमकीत सैन्याने चार दहशतवाद्यांना ठार केले. यातील दोन दहशतवादी हे पूर्वी जम्मू कश्मीरच्या पोलीस दलात होते. शुक्रवारीही चकमकीत काही दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांचा समावेश या आकडेवारीत केलेला नाही.