दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱया दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा शिक्षण मंडळाच्या वतीने ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उशिराने सुरू झाल्यामुळे परीक्षादेखील एक-दोन आठवडे उशिराने सुरू होणार आहेत.

दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात तर दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येते. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मान्यतेसाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले असून वेळापत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामार्फत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.