विदर्भात अडीच महिन्यांत 14 वाघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाघांचे आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱया विदर्भातील जंगले आणि अभयारण्यात गेल्या काही दिवसांत वाघांवर मृत्यूची संक्रांत आल्याचे स्पष्ट झाल्याने राज्याचा वन विभाग चिंतेत पडला आहे.

गेल्या 79 दिवसांत 14 वाघांचा मृत्यू झाला आहे. आज यवतमाळच्या पांढरकवडानजीक एक वाघीण गळय़ात तारांचा फास लागून मरण पावल्याचे दिसून आले. तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्रात चारी पंजे कापलेल्या अवस्थेत एका वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वाघाची शिकार वाघनखांसाठी करण्यात आली असावी असा वनखात्याच्या अधिकाऱयांना संशय आहे.

मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास यवतमाळ जिल्हय़ाच्या पांढरकवडा जवळील घोन्सालगतच्या शेतशिवारात उघडकीस आली. वाघिणीचे वय अंदाजे चार वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. घोन्सा ते सोनेगाव पांदण रस्त्यावर असलेल्या एका नाल्यात शेळय़ा राखणाऱयाला ही वाघीण मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले.