
इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या जोरावर आपले स्वप्न साकार करता येते. नांदेड जिह्यातील काेंढा गावची शेतकरीकन्या असलेल्या रेवा जोगदंड हिने हे दाखवून दिलेय. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिने अमेरिकेत विमान उडवले आहे. तिने विमान उडवल्याची माहिती मिळताच नांदेडच्या काेंढा गावातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
काेंढा येथील शेतकरी केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप जोगदंड हा 20 वर्षांपूर्वी अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीनिमित्त गेले होते. त्यानंतर ते पत्नी आणि मुलीसोबत टेक्सास येथे स्थायिक झाले. दिलीप आणि त्यांची पत्नी मेकॅनिकल इंजिनियर आहे. दिलीप जोगदंड यांनी स्ट्रिंग कंट्रोल प्लेन यावर संशोधन करून यशस्वी प्रयोग केलेला आहे. याचा परिणाम त्यांची मुलगी रेवा हिच्या बालमनावर झाला. तेव्हापासून मोठेपणी पायलट होण्याचे स्वप्न तिने बघितले आणि वयाच्या 14व्या वर्षी हे स्वप्न सत्यात उतरवले. विमान उडवतानाचा व्हिडियो तिने काेंढा येथील आजोबा केशवराव जोगदंड यांना पाठवला. तो बघून आजोबांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
अर्धापूर तालुक्यातील काेंढा हे लहान गाव आहे. तेथील काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतात. गेल्या वर्षी राम कदम या प्रगतशील शेतकऱयाने आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून तिची वरात काढून सासरी पाठवणी केली होती. त्या वेळी हे गाव चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा या गावाचीचर्चा रंगली आहे.
- दिलीप जोगदंड यांची कन्या रेवा जोगदंड हीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. पायलट होण्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि सर्व चाचण्या पार करून 20 जून रोजी तिने यशस्वी भरारी घेतली. रेवाला नासामध्ये काम करण्याची इच्छा आहे.
- आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल काsंढा गावच्या ग्रामस्थांचे ऊर अभिमानाने भरून आल्याची भावना व्यक्त केली.

























































