कत्तल करण्यासाठी ठेवलेल्या 16 गाईंची सुटका; नव्या वर्षात पोलिसांची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील आयषा कॉलनी परीसरात काटवनामध्ये विविध ठिकाणी 16 गाई बांधुन ठेवण्यात आल्या होत्या. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवषी 13 गाई व 3 गुरे काटवनामध्ये विविध ठिकाणी कत्तल करण्याच्या इराद्याने बांधुन ठेवण्यात आले हेाते. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीसांनी छापा टाकुन 16 जनावरांची सुटका केली आहे.

1 जानेवारी 2019 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या पथकाने संजयनगर भागातील हाजी मंगल कार्यालयाच्या मागील काटवनामध्ये काही गाई कत्तल करण्याच्या इराद्याने बांधुन ठेवले होते. पोलिसांनी धडक कारवाई करून 13 गाई व 3 गुरे ताब्यात घेवुन ते कोकमठाण येथील गोशाळेत पाठविले आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल वालदार राजेंद्र पुंड, पोलीस कॉन्स्टेबल अशीष मैंद, बाबा कोरेकर, संभाजी शिंदे, सुरज अग्रवाल, राघव कोतकर, आंबादास वाघ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

ही जनावरे कोणाची आहे, कोणी बांधनु ठेवली याची कोणीतीही माहिती मिळाली नाही. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गोवंश हत्या कायद्यानुसार गुन्हयाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास राजेंद्र पुंड करीत आहेत. दोन महिन्यांपुर्वी याच परीसरामध्ये सादीक कुरेशी यांच्या मालकीच्या शेडमधुन लहान मोठी 23 जनावरे पकडण्यात आली होती. त्यानंरत पुन्हा ही दुसरी कारवाई पोलिसांनी केली आहे.