दादर, माहीम, धारावीत दिवसभरात 180 रुग्ण; 17 इमारतींसह 2 चाळी-झोपडय़ा सील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढत असून दादर, माहीम आणि धारावीत आज दिवसभरात 180 रुग्ण सापडले तर आतापर्यंत 17 इमारतींसह 2 चाळी-झोपडय़ा आणि 373 मजले सील करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच पुन्हा कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. निर्बंध हटल्यानंतर लोक मोठय़ा प्रमाणात बाहेर येत असून विनामास्क फिरणाऱयांची तसेच क्वारंटाईनचे नियम तोडणाऱयांची संख्या वाढत आहे. धारावीतही मोठय़ा प्रमाणात लसीकरणाबरोबर कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. दादर, माहीम, धारावीत रुग्णसंख्या वाढत असून दादरमध्ये 47, माहीममध्ये 75 तर धारावीत 58 रुग्ण सापडले. दादर, माहीम, धारावीत आतापर्यंत 15 हजार 927 रुग्ण आढळले असून 1,250 सक्रिय रुग्ण आहेत तर 14 हजार 39 जण कोरोनामुक्त झाले आहेत.