
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला आहे. या पावसात राज्यात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 48 जण जखमी झाले आहेत.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार मैनपुरीत भागात सर्वाधिक म्हणजे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एटा अणि कासगंज भागात प्रत्येकी तीन जणांचा मृत्यू झला आहे. तर मुरादाबादमध्ये वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विस्थापित भागात बचाव कार्य राबवण्याचे आदेश दिले आहे. तसेच पालकमंत्र्यांना त्या त्या भागाचे दौरे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
























































