
दहशत माजवण्यासाठी पिस्तुल आणि धारधार शस्त्रजवळ बाळगणाऱ्या सराईताला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ विजय गायकवाड (वय 19) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तावरे कॉलनीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना एकजण बंदूक आणि पालघन सारखे हत्यार घेऊन कोणाची तरी वाट पाहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अरनेश्वर कमानीजवळून सिद्धार्थला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता पोलिसांना एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पालघनआढळले. सिद्धार्थ सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मारामारी, करणे भांडण करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. हे पिस्तूल त्याने कुठून आणि कशासाठी आणले होते याचा तपास दत्तवाडी पोलीस करत आहे.


































































