जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

21

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखील पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. उपनिरीक्षक मीना आणि हवालदार संदीप अशी त्या दोन शहीद जवानांची नावे आहेत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान व एक स्थानिक नागरिक देखील जखमी झाला आहे.

अनंतनागच्या शीन पोरा भागात केंद्रीय राखील पोलीस दलाचे जवान गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान गंभीर जखमी झाले. त्या जवानांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या