
सामना ऑनलाईन । रायपूर
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रायपूरला हलवण्यात आले आहे. हा हल्ला सुकमा जिल्ह्याच्या गोगुंडा भागात करण्यात आला आहे.
Shalabh Sinha, ASP Sukma: Both the jawans are conscious. We are trying to airlift them to Raipur for better treatment. https://t.co/ekniw67ySz
— ANI (@ANI) May 21, 2019
महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 15 पोलीस शहीद झाले होते. त्यात गाडी चालकाचाही मृत्यू झाला होता. या घटनेच्या 20 दिवसानंतर छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात हल्ला झाला आहे आणि त्यात दोन जवान जखमी झाले आहेत.
सुकमाचे एसपी शलभ सिन्हांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही जवान शुद्धीत असून त्यांना हवाईमार्गाने रायपूरला पाठवत आहोत. 26 मार्च रोजी सुकमा जिल्ह्यातच जागरगुंडा भागात सुरक्षादलाने 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

























































