शेअर मार्केटच्या गुंतवणुकीच्या मोहाने 2 लाखांचा खड्डा

43

सामना ऑनलाईन |ठाणे 

शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने गंडा घालणाऱया टोळीच्या कळवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अरविंद चौहान आणि तपेश शर्मा असे अटक आरोपींची नावे असून हे दोघे मध्य प्रदेशातून कॉलसेंटर चालवत होते. कळवा पोलिसांनी हे कॉलसेंटर उद्ध्वस्त करत या दोघांना बेडय़ा ठोकल्या.

विलास नेवासकर यांना रोहित गुप्ता नावाच्या इसमाचा फोन आला. त्याने शेअर मार्केटमध्ये नफा देण्याच्या बहाण्याने बँकेत 2 लाख 16 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार पैसे भरल्यानंतर सहा महिने उलटले तरी काहीच हालचाल न झाल्याने त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सीडीआर मिळवून रोहित गुप्ताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मोबाईल सतत बदलत असल्याने हाती लागत नव्हता. अखेर या गुन्हय़ाचे धागेदोरे मध्य प्रदेशात मिळाले. तेथील एका कॉलसेंटरवर धाड टाकून पोलिसांनी दोघांना बेडय़ा ठोकल्या. या टोळीने रिसर्च पॅनल व सिंगल स्टेप फायनान्शियल सोल्युशन नावाने देशातील अनेकांना लुटले असल्याचे तपासात समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या