
मुंबईत कोरोनाचे आज दिवसभरात 24 रुग्ण सापडले तर 18 जण कोरोनामुक्त झाले. 902 चाचण्या करण्यात आल्या तर सक्रिय रुग्णांची संख्या 156 वर पोहोचली. दरम्यान, देशात आणि राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या घटली असून राज्यात आज दिवसभरात 75 रुग्ण सापडले तर 75 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 5 हजार 304 चाचण्या करण्यात आल्या. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 485 वर पोहोचली असून एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

































































