‘हिट अँड रन’ अपघातात 30 हजार ठार

आपल्या देशात हिट अँड रनची प्रकरणे वाढत चालली आहेत.  2022 मध्ये हिट अँड रनच्या 67387 घटना घडल्या. त्यामध्ये 30 हजार 486 लोकांचा मृत्यू झाला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2013मध्ये  सुमारे 49,576 हिट अँड रनच्या घटना घडल्या. त्यामध्ये सातत्याने वाढ होत गेली. 2018 मध्ये 69882 प्रकरणे घडली. कोविड काळात म्हणजे 2020 मध्ये 52,448 घटना घडल्या. म्हणजेच कोविडमध्ये या प्रकरणांमध्ये घट दिसली. अपघात करून घटनास्थळावरून पळून जाणे म्हणजे मारपीट, पैशांची लूट किंवा कायदेशीर कारवाईत अडकण्याची भीती. केवळ नियम पुरेसे नाहीत. मोठय़ा बदलासाठी सामाजिक बदल गरजेचा आहे.

हिट अँड रन प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा असायची. मात्र सध्या कलम 106 (2) अंतर्गत तुरुंगवासाची शिक्षा 10 वर्षे करण्यात आलेय.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 58.9 टक्के हिट अँड रनच्या घटना वेगाने गाडय़ा चालवण्याने घडल्या आहेत.

एनसीआरबीच्या अहवालानुसार 2022 साली हिट अँड रनच्या  47806 प्रकरणांपैकी केवळ 16 टक्के प्रकरणात दोषारोप सिद्ध झालेत.