नगरमध्ये 3 हजार 285 प्राथमिक शिक्षक बदलीसाठी पात्र!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
teacher-1
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नगर

प्राथमिक शिक्षकांच्या राज्य पातळीवरून ऑनलाईन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया गेल्या वर्षांपासून सुरू झाली आहे. यंदाही राज्य पातळीवरून शिक्षकांच्या बदल्या होणार असून जिल्ह्यातील 3 हजार 285 प्राथमिक शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षी विक्रमी 6 हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. एकादा बदली झाल्यानंतर तीन वर्षे बदली होत नसल्याने यंदा बदलीसाठी पात्र शिक्षकांची संख्या अर्ध्याने घटली आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानूसार प्राथमिक शिक्षण विभागाने बदली पात्र शिक्षकांची यादी तयार केली आहे. या यादीनूसार अवघड क्षेत्रातील 368 शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. तसेच महिलांसाठी घोषित केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांची संख्या 341 असून सलग 10 वर्षे सेवा आणि एका शाळेवर 3 वर्षे सेवा झालेले बदली पात्र असणाऱ्या शिक्षकांची संख्या 2 हजार 63 आहे. तर अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची संख्या 432 असून उर्दू माध्यमात सलग 10 वर्षे सेवा आणि एका शाळेवर 3 वर्षे झालेल्या शिक्षकांची संख्या 76 असून याच माध्यमातील अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची संख्या 5 आहे. त्यामुळे यंदा बदलीसाठी पात्र असणाऱ्या एकूण शिक्षकांची संख्या 3 हजार 285 आहे.