
राज्यात लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्यावरून शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले. चालू वर्षात जून महिन्यापासून आतापर्यंत 370 हून अधिक मुले बेपत्ता झाली असून एकटय़ा मुंबईत गेल्या 36 दिवसांत 82 मुले बेपत्ता झाली आहेत, असे सांगतानाच गृहखाते करतेय काय, असा प्रश्न सचिन अहिर यांनी उपस्थित केला. सचिन अहिर यांनी नियम 288 अन्वये स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.



























































