
पूंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लष्करी वाहनाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. वाहनाला लागलेल्या आगीमध्ये चार जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भटातुरियन भागात हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच लष्कराचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या या घटनेबाबत लष्कराकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लष्कराचे वाहन भाटा धुरियन परिसरातून जात असताना हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक वीज चमकली आणि गाडीने पेट घेतला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण पुंछ जिल्ह्यापासून 90 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
























































