डाऊरनगर खून प्रकरणी आरोपीला 4 वर्षाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

सावत्र बापाचा खून केल्याप्रकरणी अलिबाग सत्र न्यायालय अलिबाग यांनी उरण येथील विष्णू जानू कातकरी (23) याला चार वर्ष कारावासाची शिक्षा आणि एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या सुरूवातीला उरण, डाऊरनगर येथील कातकरी वाडीत घरगुती वादातून अमिन आदम कुरेशी (54) याचा विष्णू कातकरी यांनी डोक्यात दांडक्याने प्रहार करून खून केला होता. उरण पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक 176/2018 नुसार भा.द.वि. कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने गुन्ह्याशी संबधित सर्वांची साक्ष तपासून आरोपीला भा.द.वि. कलम 304 (2) नुसार दोषी ठरवून त्याला चार वर्षे कारावास आणि एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. खून झालेला अमिन कुरेशी हा परप्रांतिय होता. मागील 25 वर्षापासून तो विष्णू कातकरी याच्या आईसोबत राहत होता. मात्र 13 सप्टेंबर 2018 ला घरगुती वादातून विष्णू कातकरी यांनी त्याचा खून केला. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाशाली सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी काठे यांनी तपास करून आरोपीला शिक्षा बजावण्यात महत्वाची कामगिरी बजावली.