44 वर्षीय इसमाने बकरीशी केले लग्न, गोंधळ वाढल्याने दिला तलाक

एक 44 वर्षीय व्यक्ती एका बकरीच्या प्रेमात पडला. त्याने बकरीला वधूची वेषभूषा करून तिच्याशी लग्न केले. तिला हुंडा म्हणून 117 रुपये दिले आणि नंतर माफी मागून तिच्याशी तलाक देखील घेतला. इंडोनेशिया मध्ये हा विचित्र प्रकार समोर आला आहे.

इंडोनेशियामध्ये राहणारा 44 वर्षीय सैफुल आरिफ एका बकरीच्या प्रेमात पडला होता. आता बकरीचेही त्याच्यावर प्रेम होते की नाही याबद्दल खात्री नाही. मात्र सैफुलने थेट या बकरीशी लग्न करण्याची घोषणा केली. त्यासाठी त्याने बकरीला 117 हुंडाही दिला. मात्र त्याने केलेला हा प्रकार त्याच्या जवळच्या अनेकांना आवडला नाही. यामुळे गोंधळ वाढला आणि त्यानंतर सैफुलने माफी मागत या बकरीला तलाक दिला.

हे विचित्र प्रकरण इंडोनेशियातील ग्रेसिक शहरातील आहे. सैफुल हा युट्युबर असल्याचे सांगितले जात आहे. एके दिवशी त्याला कुठेतरी एक बकरी दिसली. ही बकरी इंडोनेशियातील बेंझेंग जिल्ह्यातील क्लाम्पोक गावातील होती. सैफुलने या बकरीसोबत लग्न केले. यावेळी 117 रुपये हुंडा म्हणून देण्यात आला. यावेळी बकरीला वधूची वेशभूषा करण्यात आली होती. या लग्नाला काही स्थानिक लोकही पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि वराच्या पेहरावात सैफुल होता. मात्र ही गोष्ट लोकांना आवडली नाही आणि त्यांनी हुल्लडबाजी सुरू केली. अखेर गोंधळ वाढल्यावर सैफुलने माफी मागितली. फेमस होण्यासाठी मी हे केल्याचे सैफुलने सांगितले. मात्र आता यापुढे मी बकरीशी संबंध ठेवणार नसल्याचे त्यांने सांगितले.