Lok Sabha 2019 लोकसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत आज पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील 17 मतदारसंघापैकी 15 मतदारसंघात एकूण 48 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यंत 16 मतदारसंघात 71 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

वर्धा लोकसभा मतदारसंघात 6, रामटेक मतदारसंघ 2, नागपूर मतदारसंघ  12, भंडारा- गोंदिया मतदारसंघ 6,  गडचिरोली- चिमूर मतदारसंघ 4,  चंद्रपूर मतदारसंघात 2 आणि यवतमाळ- वाशिम मतदारसंघात 11 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

बुलढाणा मतदार संघ 1, अकोला 2,  अमरावती 5,  हिंगोली 2,  नांदेड 11,  परभणी 3,  बीड 1.  उस्मानाबाद मतदारसंघात आज रोजी तसेच आजपर्यंत 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 42- सोलापूर मतदारसंघात आतापर्यंत एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.