जय श्रीराम! राममंदिरासाठी घटनापीठ, 10 जानेवारीपासून सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme_court_295

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अयोध्येतील राममंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. गुरुवारपासून (दि. 10) सुनावणी होणार असून अवघ्या देशाचे याकडे लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठात न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्या. एन.व्ही. रामन, न्या. उदय उमेश ललीत आणि न्या. डी.वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. अयोध्याप्रकरणी लवकरात लवकर निवाडा करण्याची विनंती सर्वच पक्षकारांनी केली आहे. 6 जानेवारीला सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार घटनापीठ स्थापन केले असून 10 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे.