मुंबई सेंट्रलमधील 62 झोपडय़ा जमीनदोस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळामधील मुंबई सेंट्रल परिसरात असलेल्या सुमारे 62 झोपडय़ा महापालिकेने आज जमीनदोस्त केल्या. महात्मा गांधी पथक्रांती योजनेअंतर्गत या झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली. कारवाईमुळे रिझर्व्ह बँक स्टाफ क्वॉर्टर्स आणि मराठा मंदिर मार्गावरील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील पात्र झोपडीधारकांना चेंबूर येथील मुकुंदनगर, मैसूर कॉलनी येथे पर्यायी घरे देण्यात आली आहेत.

ही कारवाई महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांची मदत घेऊन करण्यात आली. कारवाईत 135 कामगार, 2 जेसीबी, 8 डंपर यांचा वापर करण्यात आला. परिमंडळ 1 चे उपायुक्त हर्षद काळे व ‘ई’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.