पृथ्वी शॉ, मयांकचा शतकी धमाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लिसेस्टर

पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थान ‘अ’ संघाने मंगळवारी पुन्हा एकदा आपली धमक दाखवली. पृथ्वी शॉ व मयांक अगरवाल या सलामीवीरांनी शतकी धमाका केल्यामुळे हिंदुस्थान ‘अ’ संघाने लिसेस्टरशायरविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सराव सामन्यात ४५८ धावांचा विक्रमी पाऊस पाडला. प्रथमश्रेणी क्रिकेटमधला हाही विक्रमच.

पृथ्वी शॉ (१३२ धावा) व मयांक अगरवाल (१५१ धावा) या सलामीवीरांनी २२१ धावांची सणसणीत भागीदारी रचली. त्यामुळेच हिंदुस्थान ‘अ’ संघाला ४ बाद ४५८ धावा उभारता आल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या लिसेस्टरशायर संघाचा डाव १७७ धावांमध्येच गडगडला. त्यामुळे हिंदुस्थान ‘अ’ संघाला २८१ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला.