रत्नागिरीतील ५८४ पोस्टमास्तर ऑनलाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

रत्नागिरी पोस्ट कार्यालयात पुढील महिन्यापासून इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरु होणार आहे़. अन्य राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना व्यवहार कंरता येणार आहेत. माहिती र दर्पण असे या योजनेचे नाव असून या योजनेंतर्गत रत्नागिरीतील ५८४ पोस्टमास्तरांना हॅण्ड हेड डिव्हाईस देण्यात येणार आहे़. या यंत्राच्या माध्यमातून पोस्टातील सर्व व्यवहार होणार असल्याची माहिती रत्नागिरीचे डाकघर अधिक्षक ए़ बी क़ोडा यांनी दिली़ आहे.

डाकं विभाग सध्या अत्याधुनिकं प्रणालीचा वापर कंरत आहे़. त्याच्या माध्यमातूनच बँकींग प्रणालीमध्ये डाक विभाग उतरला असून इंडिया पोस्ट पेमेंट बँक पुढील महिन्यापासून रत्नागिरीत सुरु होत आहे़. या बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणेच बचत ठेवी, ऑन लाईन बँकींग या सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. बँकेच्या माध्यमातून एटीएम कार्डची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे़. जिल्ह्यातील ५८४ डाकं कार्यालयातील पोस्टमास्तरला हॅण्ड हेड डिव्हाईस देण्यात येणार आहे़. या डिव्हाईसच्या माध्यमातून तो ऑनलाईन व्यवहार कंरणार आहे़. त्यामुळे आधीच्या तुलनेत डाकविभागाचे सर्व कामकाज आता वेगात होणार आहे़.