
सामना ऑनलाईन । सीतापूर
उत्तर प्रदेशमधील सीतापूर मध्ये एका विवाहित महिलेने छेडछाडीला विरोध केल्याने तिला जिवंत जाळले आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. विवाहित महिलेची स्थिती नाजूक असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसात ती ८० टक्के भाजली आहे.
काही दिवसांपूर्वी विवाहित महिला शौचालयासाठी शेतात जात होती. तेव्हा गावातील दोन तरुणांनी तिच्यावर जबरदस्ती करत ऊसाच्या शेतात नेण्याचा प्रयत्न केला. विवाहित महिलेने जोरधार विरोध केला आणि त्यानंतर हे दोन आरोपी तिथून पळून गेले. विवाहित महिलेने कुटुबीयांसोबत पोलिसांत तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे दोन तरुणांची हिंमत आणखीणच वाढली
दुसर्यांदा जेव्हा पुन्हा ही महिला शौचालयाला गेली तेव्हा तिच्यावर या गुंडानी तेल टाकले आणि आग लावली. यानंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच या प्रकरणी हलगर्जी दाखवल्याप्रकरणी चार पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे.





















































