
सामना ऑनलाईन,बीड
- एक दुष्काळ मी हटवतो दुसरा (राजकीय) दुष्काळ तुम्ही हटवा
- दुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर
- माणसांसाठी पाण्याच्या टाक्यांप्रमाणेच. जनावरांसाठी पाण्याचे हौदही शिवसेना देणार आहे
- बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली, हे खरं आहे की खोटं ?
- जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ?
- ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात
- पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झालाय
- मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो
- सामनामध्ये येते ते सत्यच असते
- खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते
- युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला
- तुमचे दिवस राहिलेत तरी किती? उद्धव ठाकरेंचा सवाल
- सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय
- मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही
- मग ते लेझिम पथक होतं का बँजो पथक !
- केंद्रीय पथक येऊन गेलं, तुमच्या हातात काही मदत पडली का ?
- दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते
- स्वस्तामध्ये घर देईन नुसतं असं बोलून घर मिळतं का ?
- कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही
- दिवाळीमध्ये रामदास कदम यांनी शिवसेनेतर्फे ५ हजार कुटुंबीयांना धान्य वाटप केले होते
- आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे
- नवं वर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छी वर्षही येऊद्या अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो
- नवीन वर्ष सुरू होऊन 8-10 दिवस झालेत
- आशीर्वाद लॉन्समधील सभेला सुरुवात
- उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप
- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मंचावर आगमन
- उद्धव ठाकरे बीडवासीयांना आणि शेतकऱ्यांना संबोधित करणार
- थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आगमन होणार
- संधीसाधू येती घरा, समजा निवडणुका आल्या- उद्धव ठाकरे
- निर्लज्ज, निर्घृणपणा शिवसेनेला जमणार नाही
- गाई-बैलाची जबाबदारी घेतल्यानंतर आपण त्याचे पालक होतो, ते आपले धन आहे- उद्धव ठाकरे
- सत्ता असली काय नसली काय, मी तुमच्या सोबत आहे-उद्धव ठाकरे
- मी इथे ऋण व्यक्त करायला आलो आहे-उद्धव ठाकरे
- कोरडी भाषणं ठोकून उपयोग नाही,घोषणांचा पाऊस खूप होईल पण त्याने तुमचे हंडे भरणार नाही-उद्धव ठाकरे
- माझ्या शेतकरी दादांनो म्हणत उद्धव ठाकरे यांनी संबोधित करायला सुरुवात केली
- दुष्काळ गंभीर तिथे उद्धव ठाकरे खंबीर-रामदास कदम
- दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याच्या टाक्यांचे वाटप केले जाणार, दुष्काळग्रस्तांसाठी धान्याची मदतही केले जाणार
- उद्धव ठाकरे इथे राजकारण करण्यासाठी नाही तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आले आहेत-रामदास कदम
- फोटोंचे प्रदर्शन भरवून त्यातून जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरेंनी दिली-रामदास कदम
- २७ हजार शेतकऱ्यांच्या घरी धान्य पोहचवले-रामदास कदम
- मराठवाड्याचा शेतकरी अडचणीत सापडलेला असताना त्यांना मदत करणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे-रामदास कदम
- चारा वाटप कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांचे म्हाळसजवला येथील मंचावर आगमन
- चारा वाटप शुभारंभासाठी उद्धव ठाकरे म्हाळसजवला कडे रवाना
- उद्धव ठाकरे यांचे बीडमध्ये आगमन
- उद्धव ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष
- बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथे सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात येणार आहे.
- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुष्काळी दौरा थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.


































































