
सामना प्रतिनिधी । हडोळती
सगळीकडे दुष्काळी परिस्थीती उद्भवल्याने सगळीकडे भकास वातावरण दिसत आहे. परंतु उमरगा (रेतू) येथील युवा शेतकरी हरिदास दत्ता ढोबळे यांनी कष्टातून पिकवलेली फळबाग सवाचे लक्ष वेधत आहे. मुखेड – शिरुर 225 राज्य मार्गावर उमरगा पाटी येथे ओसाड माळरानावर ही पपईची बाग आहे. दुष्काळापासून बाग वाचविण्यासाठी त्यांचे सर्व कुटुंबीय अपार मेहनत घेत आहेत.
उमरगा (रेतू) येथील शेतकरी लातूर जिल्ह्यात टमाटे पिकविण्यासाठी आग्रेसर असतात वर्षाचे बारमाही येथील शेतकरी टमाट्याचे उत्पादन घेतात.परंतु युवा शेतकरी हरिदास ढोबळे यांनी पांरपारिक शेतीला छेद देत एका एकरात तैवान 786 जातीच्या कोळपा नर्सरी येथून 1000 पपईच्या रोपाची लागवड केली. पाणी पुरवठा त्यांनी अल्प पाण्यावर चालू आसलेल्या बोअरमधून ठीबकच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली. वेळेवर खत, पाणी, औषधी देऊन अपार कष्ट करून दिवसरात्र मेहनत घेत याचे उत्पादन सुरु झाले असता अचानकच वातावरण बदलाचा फटका या झाडांना बसला व अतीथंडीमुळे या झाडाची पाने वाळू लागली त्यामूळे याचा परिणाम उत्पादनावर जाणऊ लागला आहे. संकटाशी जिद्दीने सामना केला तर एक वेगळाच इतिहास निर्माण होतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे येथील युवा शेतकरी ढोबळे हे भीषण पाणी टंचाईच्या जिद्दीने व कष्टाच्या बळावर संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत असतात त्यांच्या तीन एकर माळरान जमिनीवर दीड एकर भाजीपाल्याची लागवड केलेली दिसत होती परंतु रोगराईमुळे उत्पादनात घट होत आहे.




























































